मुंबईः मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भूस्खलन, दरड कोसळणे, पूर येणे, रस्ते खचणे, झाडे उन्मळून पाडणे; यासारख्या घटना घडत असतात. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंत्रणांची आढावा बैठक घेऊन उपाययोजनांसंदर्भात आदेश दिले.
बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून NDRF, SDRF सह महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भूस्खलनासारख्या घटना कशा टाळता येतील, याचा आढावा घेतला. 'झिरो कॅज्युअल्टी मिशन' नुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अन्नधान्याचा साठा, गावांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना, इतर राज्यांशी संपर्क करण्याची बाब यवरही चर्चा झाली. लोकांना संकटाबाबत जागृत करण्याचा प्रयत्न कसा करता यईल, धोकादायक इमारतीतील लोकांचे स्थलांतरण कसे करता येईल, याचा आढावा घेतला. याशिवाय दुष्काळाबाबत चर्चा झाली असून मदत व पंचनामा यावर सखोल चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
जनतेला त्रास होऊ नये, जीविताला धोका होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या,यंत्रणा सज्ज आहेत, बैठकीतील सर्व बाबींची अंमलबजावणी होईल,संकट येऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल,लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे,तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन कसे करता येईल, तुकड्या वाढवण्यासाठी चर्चा झाली,कोस्टल रोडच्या गळतीची पाहाणी,मुंबईत काही महिन्यांपूर्वी कोस्टल रोडचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं. परंतु कोस्टल रोडच्या बोगद्यांच्या भीतींना गळती लागल्याचा प्रकार उघडकीस आलेला होता. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडच्या गळतीची पाहणी केली आणि दुरुस्तीबाबत सूचना केल्या आहेत.