Advertisement

 पाठपुरवठा करूनही घरकुलाचा हप्ता मिळता मिळेना

प्रजापत्र | Wednesday, 15/05/2024
बातमी शेअर करा

यवतमाळ- घरकुलचा हप्ता मिळत नसल्याने एका युवकाने टोकाचे पाऊल उचलेल आहे. यात या तरुणाने पंचायत समितीत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या अनेक दिवसापासून घरकुल करिता असलेला हप्ता मिळत नसल्याने या तरुणाने आज बुधवारच्या दुपारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समितीमध्ये स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, गटविकास अधिकारी आर. आर. खरोडे यांनी वेळीच हस्तक्षेप करुन हा सर्व प्रकार रोखत या युवकाची समजूत काढली. अन्यथा पंचायत समितीत आज मोठी घटना घडली असती. संतोष उकंडराव बुटले असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे मात्र आर्णी पंचायत समितीमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 

 

 

पंचायत समितीतच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीच्या माळेगाव येथील रहिवाशी असलेले संतोष उकंडराव बुटले यांचे वडील उकंडराव बुटले यांना घरकुल योजनेतून घर मिळाले होते. त्यासाठी त्यांना पहिल्या हप्त्यात 15 हजार रूपये मिळाले. मात्र, दुसरा हप्ता देण्यास पंचायत समिती मधील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप बुटलेंनी केलाय. अधिकाऱ्यांना वारंवार विनंती करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचेही बुटले म्हणले.

 

 

वडिल वयोवृद्ध असल्याने त्यांना कायम ये-जा करणे शक्य होत नव्हते. दूसरा हप्ता मिळावा यासाठी संतोष बुटले याने वेळोवेळी पाठपुरवठा सुरु ठेवला. मात्र, आपल्या सर्व प्रयत्नांना अपयश आल्याच्या संतापातून अखेर आज संतोष यांनी टोकाचे पाऊल उचलत आर्णीच्या पंचायत समितीमध्येच स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखात ही घटना रोखून धरली आणि मोठा अनर्थ टळला. 

Advertisement

Advertisement