Advertisement

केज बसस्थानकात चोरीचे सत्र सुरूच 

प्रजापत्र | Wednesday, 08/11/2023
बातमी शेअर करा

 केज- बसस्थानकात गेल्या काही दिवसा पासुन भुरट्या चोरानी धुमाकूळ घातलं असुन चक्क बस मध्ये महीला चडत असताना गळ्यातील दागीने व पर्स चोरीचे प्रमाण वाढतच चालले असुन याकडे पोलीसांनी या चोराचं बंदोबस्त कराव अशी मागणी होत आहे. आज दुपारी दिडच्या दम्यान मेहकर पंढरपूर बस केज बस्थनकात आली असता उस्मानाबादकडे जाण्यासाठी दोन मुली बस मध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यानी एका मुलीचे पर्स चोरीला गेला हि बाब मुलीच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी चालु बस मध्ये रडायला सुरवात केली हे पाहुन चालकाने गाडी पोलीस ठाण्यात घेवून गेले असता पोलीसांनी बसमध्ये आलेल्या सर्वच प्रवाशांची तपासनी केली मात्र चोरीला गेलेली पर्स अढळून आली नाही आखेर त्या मुलीला काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मदत करुण पाठवून दिले आणी चोरीला गेलेल्या पर्सचा तपुस सुरु केला असल्याचे दिसुन आले मात्र बस ठाण्यात येताच नागरिकांनी पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती.

Advertisement

Advertisement