लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये सभा आणि प्रचार सुरू आहेत. अशात काल अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर काल हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. त्यानंतर आज सकाळपासूनच या मैदानावरून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा तसेच रवी राणांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. अशात आता रवी राणा यांनी बच्चू कडूंवर सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
बच्चू कडूंना उद्धव ठाकरे फायनान्स करत आहे. बळवंत वानखडे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मतांचा विभाजन करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. बच्चू कडू यांना उद्धव ठाकरेंकडून नवनीत राणा यांना पाडण्यासाठी सुपारी देण्यात आलीये घेतलेलीय, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केलाय.आमदार बच्चू कडू यांनी यासाठी सुपारी घेतली आहे. बच्चू कडू यांच्याकडे वारे माप संपत्ती आहे. त्यांचे घोटाळे मी लवकरच उघडकीस आणणार आहे, असा इशारा आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंना दिलाय.
मैदान कुणाला मिळालं?
अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर २३ आणि २४ एप्रिलला बच्चू कडू यांना सभेसाठी परवानगी मिळालेली होती. मात्र ऐनवेळी अमित शाहंची सभा ठेवण्यात आली. सायन्स कोर मैदानाच्या जागेवरुन हायहोल्टेज ड्रामा झाल्यानंतर अखेर बच्चू कडू यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.महायुतीकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये म्हणून आम्ही माघार घेत असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.