Advertisement

वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला

प्रजापत्र | Friday, 08/01/2021
बातमी शेअर करा

रायगड-रायगडमध्ये शुक्रवारी (दि.८) सायंकाळी भीषण अपघात झाला असून वऱ्हाडाचा ट्रक ३०० फूट दरीत कोसळला आहे. पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर झाला वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात झाला आहे. हा ट्रक रत्नागिरी येथून पोलादपूरला जात असताना हा अपघात झाला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. घटनास्थळी चार मृतदेह सापडले असून २० ते २२ लोक जखमी झाल्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

या ट्रकमध्ये जवळपास २५ लोक प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि ट्रेकर्स दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरु असून अंधार असल्याने अडथळा येत आहे. जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे. तसंच रक्ताची गरज भासेल यासाठी ब्लड बँकेलाही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती निधी चौधरी यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement