चकलांबा- आगामी लोकसभा निवडणूक व आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने चकलांबा पोलिसांनी उमापूर येथील मंत्रालय धाबा, निवांत धाबा, उमापूर फाट्या नजीक असलेले पत्र्याचे शेड, तसेच चकलांबा येथील बिचकूल धाबा व फुलसांगवी येथील हातभट्टी अड्ड्यावर वेगवेगळ्या वेळी धाड टाकून देशी विदेशी अवैध दारूचा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल सील करून २० हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट केले.
अधिक माहिती अशी कि, चकलांबा पोलिसांनी उमापूर येथील मंत्रालय धाबा,निवांत धाबा, उमापूर फाट्या नजीक असलेले पत्र्याचे शेड,तसेच चकलांबा येथील बिचकूल धाबा व फुलसांगवी येथील हातभट्टी अड्ड्यावर वेगवेगळ्या वेळी धाड टाकून देशी विदेशी अवैध दारूचा ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल सील करून २० हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट केले.
यातील पाचही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. चकलांबा पोलीस ठाणे येथे दारूबंदी कायदा कलम ६५ (३) ( फ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, पोलीस उपनिरीक्षक कुमावत, पोलीस कॉन्स्टेबल खटाणे, पोलीस कॉन्स्टेबल पवळ, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे, पोलीस हवालदार पवार पोलीस हवालदार येळे यांनी केली.