बीड : कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात येत असतानाच आता एका नव्या साथीचं संकट घोंघावताना दिसत आहे. हे संकट आहे 'बर्ड फ्लू' चं.गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ आणि पंजाब या राज्यात खूप प्रमाणात काही पक्षी मरण पावलेले आढळून आले बर्ड फ्लू मुळे पक्षांचा मृत्यू होत असल्याने या राज्यात अलर्ट जारी करण्यात आला. H5N1 व्हायरसमुळे हा आजार होतो . या आजाराची लागण विशेषतः पक्ष्यांना लवकर होते राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने केंद्र सरकारला हिमाचल प्रदेशात मृतावस्थेत आढळून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू 'बर्ड फ्लू' म्हणजे एव्हियन इन्फ्लूएन्झामुळे झाला असल्याचा रिपोर्ट दिला आहे.
महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणजे राज्यात 'बर्ड फ्लू'मुळे पक्षी मृत झालेले आढळून आलेले नाहीत. राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आलेला नाही. पण खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यभर अलर्ट जारी केला आहे.याबाबत बोलताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, "सद्यस्थितीत राज्यात बर्ड फ्लू संसर्ग झाल्याचं आढळून आलेलं नाही. राज्य भरात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार अलर्ट आहे. एकही पक्षी मृतावस्थेत आढळला तर तात्काळ तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता चिकन खावे कि नाही ?
या आजारानंतर सर्वांच्या मनात आलेला प्रश्न म्हणजे आता चिकन आणि अंडी खायची कि नाही जर खाल्ली तर माणसात सुद्धा बर्ड फ्लू चा प्रसार होईल का ? तर नाही चिकन किंवां अंडी जर व्यवस्थित शिजवलेली असतील तर चिकन किंवा अंडी खाल्ल्याने काहीही होणार नाही