अहमदपूर/ प्रतिनिधी.
अहमदपूर तालुक्याला मण्याड नदीच्या खोऱ्या चे मोठे वरदान लाभले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माण्याड नदीच्या खोऱ्यातील वाळू अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर तहसीलदार साहेब व तहसील कार्यालय अहमदपूर यांच्या आशीर्वादाने चालू आहे.त्यामुळे अहमदपूर तहसील कार्यालय अवैध वाळू वितरण केंद्र बनल्याचे चर्चा जनमानसात मोठ्या चवीने चालू आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी, एमआयएम,शिवसेना वणेक पक्ष संघटेंच्या वतीने अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी असूनही तहसीलदार अहमदपूर यांकडे दुर्लक्ष करत आहेत. याही पुढे लोकांमध्ये चर्चा आहे की,तहसीलदार अहमदपूर यांच्या पाहुण्यातील एक शाम कुलकर्णी तलाठी यांना मुक आदेश देवून वाळू माफिया कडून७७लक्षी
रू. जमा केले असून त्याची वाटणी खालच्या कर्मचाऱ्यांना मिळाली नसल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत दबक्या आवाजात चालू आहे. हे कांहीं का असेना वाळू माफिया मात्र बिनधास्त अवैध वाळू उपसा करत आहेत.
मागील काळात अवैध वाळू उपसा करणाऱ्या लोकांमुळे दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे मौ.तांबट सांगवी येथील पोलिस पाटील श्री संजय कदम व मांनखेड येथील सिध्दार्थ कांबळे यादोघना जीव गमवावे लागले.
या वरून असे लक्ष्यात येते की वाळू माफिया बेडर झाला आहे त्यास प्रशासनाची साथ आहे. परंतु एकंदरीत नदीच्या पात्राची होणारी झीज, त्यामुळे नदीकाठच्या लोकांना वाढणार धोका या मुळे जनता नाराज आहे व वाळू माफियांच्या मस्त्वालपणास कंटाळली असून तत्काळ अवैध वाळू उपसा बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.