Advertisement

एकही खासदार नसताना मी केंद्रीय मंत्री

प्रजापत्र | Sunday, 17/03/2024
बातमी शेअर करा

वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. ते महाविकास आघाडीसोबत जाण्यास इच्छुक असतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल होत आहे. त्यांचा अपमान होत आहे'', असं केंद्रीय मंत्री आणि आरपीआय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

 

 

ते म्हणाले की, ''महाविकास आघाडीमध्ये त्यांचा अपमान होत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये. त्यांना सन्मानजनक जागा मिळत असेल तर त्यांनी तिथे जाण्यास हरकत नाही. पण ते जातील असं वाटत नाहीये.''

रामदास आठवले म्हणाले, ''मी एनडीएमध्ये आहे. माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं. एकही जागा नाही मिळाल्याने मी त्यांना सोडणार नाही. लगेच सोडण्याचा विचार होत नाही.'' 

Advertisement

Advertisement