मुंबई- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत धडकली आहे. या यात्रेचा आज शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार असून इंडिया आघाडीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्याच ठिकाणी काँग्रेसची सभा होत आहे. त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जणं बसलेत. त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
बातमी शेअर करा