पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटातून परतलेले आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याआधी खासदार अमोल कोल्हे आणि मनसेला सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे दोघेही पक्ष कार्यालयात दाखल झाले. निलेश लंके आणि वसंत मोरे हे दोघेही तुतारी फुंकून, राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता होती. त्याप्रमाणे निलेश लंके यांनी प्रवेश केला, मात्र वसंत मोरे यांनी प्रवेश न करता, ते माघारी परतले. निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते. ते अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी झाले.
बातमी शेअर करा