Advertisement

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढल्या

प्रजापत्र | Tuesday, 27/02/2024
बातमी शेअर करा

मुंबई- अंतरवली सराटीत झालेल्या दगडफेकीचे आज विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावरही सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील हे कट कारस्थानाची भाषा बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

 

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तर अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामागे राष्ट्रवादी असेल तर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

Advertisement