Advertisement

जरांगे मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

प्रजापत्र | Sunday, 25/02/2024
बातमी शेअर करा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी जालन्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलनास्थळावरून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर आता मराठा आंदोलकही त्यांच्यासोबत निघाले आहेत. या सर्व घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

 

देवेंद्र फडणवीस हे साताऱ्यात उपस्थितांना संबोधित करत असताना दुसरीकडे जालन्यात मनोज जरांगे यांनी सगेसोयरे कायदा, आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली. मनोज जरांगे हे शेकडो आंदोलकांसोबत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या सर्व घडामोडींवर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'मनोज जरांगे काय म्हणाले, मी ऐकले नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.

Advertisement

Advertisement