Advertisement

सौरव गांगुलीला हृदयाविकाराचा झटका.

प्रजापत्र | Saturday, 02/01/2021
बातमी शेअर करा

BCCI चे अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरभ गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

         शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करून झाल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुली यांना दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर आज सांयकाळी अँजिओप्लास्टी केली जाणार आहे.हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर लगेचच त्याला जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला शुक्रवारी रात्रीपासूनच बरं वाटत नव्हतं. पण शनिवारी त्याने दैनंदिन वेळापत्रकानुसार काम करण्यास सुरूवात केली. सकाळी जिममध्ये व्यायाम करतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. डॉक्टर्स त्याच्यावर उपचार करत असून हृदयविकाराचा झटका आल्यानेच असं घडलं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Advertisement

Advertisement