छत्रपती संभाजीनगर मध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाज बांधवांनी ठिय्या मांडलाय. यावेळी समाज बांधवांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शन केलीय.
मागील तीन ते चार दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेतील आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर, कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन केले जात आहे.या अगोदर पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे आणि आता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाज बांधव आणि भगिनी ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत.
बातमी शेअर करा