बीड-कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेला बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याचे आणि निवडणुकीसाठी कार्यक्रम प्रस्तावित करण्याचे निर्देश सहकारी निवडणूक प्राधिकरनाणे दिल्या आहेत . त्यामुळे आता जिल्ह्यात बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. मात्र बँकेच्या आगामी निवडणुकीत राजाभाऊ मुंडे यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती साखरी बँकेसाठी येत्या 2 महिन्यात केव्हाही मतदान होऊ शकते. बँकेची 1250 मतदारांची यादी देखील यापूर्वीच प्रसिद्ध झाली आहे. बँकेच्या 19 संचालकांसाठी निवडणूक अपेक्षित आहे. यातील 11 संचालक सेवा सोसायटी मतदारसंघातील आहेत तर 5 संचालक हे सर्व मतदारांमधून निवडून दिले जातात . यामध्ये राजाभाऊ मुंडे समर्थक मतदारांची संख्या 300 हुन अधिक असल्याचे मानले जाते. त्यामुळे राजाभाऊ मुंडे काय भूमिका घेतात यावर निवडणुकीची समीकरणे बर्यापैकी अवलंबून आहेत.
सेवा सोसायटी मतदारसंघातील 11 जागचे चित्र बर्यापैकी स्पष्ट आहे. यात बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर आणि आ. संदीप क्षीरसागर गटात लढत होईल. तर आष्टीत आ. सुरेश धस यांचा उमेदवार प्रभावी ठरेल. पाटोद्यातून रामकृष्ण बांगर यांचा उमेदवार वरचढ असेल. शिरूरमध्ये भाजप , माजलगावमध्ये आ. प्रकाश सोळंके समर्थक तर वडवणी आणि धारूरमध्ये रमेश आडसकर आणि राजाभाऊ मुंडे एकत्र आले तर त्यांचा उमेदवार जिंकू शकेल असे चित्र आहे. गेवराईत माजी आ. अमरसिंह पंडित , परळीत धनंजय मुंडे समर्थक उमेदवार महत्वाचा ठरेल . अंबाजोगाईच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस होऊ शकते . तर केज मध्ये आडसकर यांचा प्रभाव राहील.
पतसंस्थेच्या जागेवर सुभाष सारडा समर्थक तर प्रक्रिया संस्थांमध्ये अमरसिंह पंडित समर्थकाला संधी आहे. मात्र महिला(2), अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी (प्रत्येकी 1 ) या पाच जागांवरील मतदारांमध्ये राजाभाऊ मुंडे यांचे पारडे जड असल्याने त्यांची भूमिका निर्णायक असेल.