Advertisement

‘प्रजापत्र ’च्या सहसंपादकपदी संजय मालाणी तर समीर लव्हारे कार्यकारी संपादक

प्रजापत्र | Friday, 01/01/2021
बातमी शेअर करा

बीड-दैनिक प्रजापत्रचे कार्यकारी संपादक संजय  मालाणी यांना सहसंपादकपदी तर वृत्तसंपादक असलेले समीर लव्हारे यांना कार्यकारी संपादक म्हणून पदोन्नती देण्यात आल्याची घोषणा ‘प्रजापत्र’चे संपादक सुनील क्षीरसागर यांनी केली.  
 श्री मालाणी आणि श्री लव्हारे  नवीन जबाबदारीची सूत्रे दि. 1 जानेवारी पासून घेणार आहेत. मागील 20 वर्षांपासून पत्रकारितेत असलेले संजय मालाणी ‘प्रजापत्र ’ च्या सुरुवातीपासून कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा पत्रकारितेतील विविध क्षेत्रांचा  अनुभव दांडगा आहे. राजकीय, सामाजिक आणि सर्वच विषयावरील लिखाणाची त्यांची एक वेगळी शैली आहे. त्यांना आता सहसंपादक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. तर मागील 4 वर्षांपासून पत्रकारितेत असलेले आणि ‘प्रजापत्र’मध्ये वृत्तसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळणारे समीर लव्हारे यांना कार्यकारी संपादक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. समीर लव्हारे यांचा क्रीडा क्षेत्रातील पत्रकारितेचा चांगला अनुभव असून मागील वर्षभरापासून ते बातम्यांचे संपादन तसेच बहुरंग पुरवणीची जबाबदारी  देखील पाहात होते. त्यांच्याकडे आता कार्यकारी संपादकपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. 

‘प्रजापत्र’ चे संपादक सुनील क्षीरसागर आणि  व्यवस्थापनातील सहकारी  डॉ. धनंजर बहिर व निळकंठ कुटे व्यवस्थापक मिलिंद आदमाने यांनी पदोन्नतीबद्दल दोघांचेही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

Advertisement

Advertisement