गेवराई - जुन्या भांडणाची कुरापत काढून गायरान जमीन परिसरात एकास धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केल्याची घटना ताकडगाव येथे घडली आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक भगवान धुमाळ (वय ३० वर्षे) हा तरुण शासकीय गायरान परिसरामध्ये शौचास गेला होता. या ठिकाणी त्याच्या सोबत प्रभाकर शिनगाडे व इतरांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यास मारहाण करण्यात आली. त्याच्या हातावर धारदार शस्त्राने वार करून जखमी करण्यात आले. यात सदरील तरुण जखमी झाला आहे. या प्रकरणी अशोक धुमाळ यांच्या फिर्यादीवरून प्रभाकर शिनगाडे, गणेश शिनगाडे व हरी भिसे या तिघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा