राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात सुनावणी संपली आहे. पुढील सुनावणी २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. आज अर्धा तास सुनावणी घेण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे.
२३,२४ जानेवारीला उर्वरित ४ जणांची उलट तपासणी होणार आहे. २५ तारखेला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे. २९ जानेवारीला दोन्ही गटांचे लेखी सबमिशन दिले जाणार. ३० तारखेला अंतिम युक्तिवाद होणार असून ३१ जानेवारीला सुनावणी पूर्ण करायची आहे. त्यापुढे ८ ते १० दिवस अंतिम निकाल जाहीर करणार, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा