बीड (प्रतिनिधी)- लोकनेते विनायकराव मेटे यांनी मुलींचा जन्म दर वाढावा यासाठी सुरू केलेली चळवळ पुढे सुरू ठेवत आज शिवसंग्रामच्या वतीने जिल्हा रुग्णालयात जिजाऊ जयंती निमित्त जन्मलेल्या मुलींचे स्वागत करून त्यांच्या मातांचा सन्मान करण्यात आला यावेळी मुलींना कपडे आणि त्यांच्या मातांना साडी चोळी देण्यात आली या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष नारायण काशीद, अनिल घुमरे
सुहास पाटील, मनोज जाधव, गणेश मोरे, शेषेराव तांबे, पंडित शेंडगे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मनीषा कुपकर, मा. पंचायत समिती सभापती मनीषा कोकाटे व शिवसंग्रामचे पदाधिकारी आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा