बीड- किराणा दुकानावर बिस्कीट आणण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय विद्यार्थीनीला संगनमताने जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून तिला एका खोलीवर नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना काल सायंकाळी शिवाजी नगर पोलिस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी दोन नराधम तरूणा विरूध्द गुन्हा दाखल झाला असुन या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी कि,शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाणे हद्दीतील विद्यार्थीनी किराणा दुकानावर बिस्कीट आणण्यासाठी गेली होती. त्या ठिकाणी आरोपींतानी संगनमत करून तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून शिवाजी नगर ठाणे हद्दीतीलच एका दुसऱ्या भागातील कृष्णा आरे याच्या रूमवर नेले. त्या ठिकाणी जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दि. २७ डिसेंबर रोजी रात्री ७.४५ ते ८.४५ या वेळेत घडली.
या प्रकरणी पिडीतेच्या वडीलांनी दिलेल्य तक्रारीवरून कृष्णा आरे (वय २२ रा. बीड) याच्यासह अन्य एक अनोळखी मुलगा वय अंदाजे १९ वर्षे या दोघांविरूध्द शिवाजी नगर पोलिस ठाण्यात कलम ३७६, ३७६ (२) (आय), ३७६ (२) (आय), ५०४, ५०६, ३४ भादंवीसह कलम ४,८,१२ लैगिंक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो. नि. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि लांडगे करीत आहेत.