मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झालाय. अपघातानंतर बस पटली झाली अन् आग लागली. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर १४ प्रवाशी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच उपस्थितांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजतेय.
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि डंपरचा अपघात बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. गुना - आरोन महामार्गावर हा भीषण अपघात झाला. डंपर महामार्गावर उलट्या दिशेने येत होता.. त्यावेळी डंपने प्रवाशी बसला जोरदार धक्का दिला. डंपरची धडक बसल्यामुळे बस पलटी झाली. त्यानंतर बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झालाय.
बातमी शेअर करा