लातूर - आईला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र आईने दारू पिण्यास पैसे मिळणार नाही असे सांगून नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने मुलाने आईच्या डोक्यात लोखंडी घुसा मारून हत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यात समोर आली आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सताळा खुर्द येथे ही घटना घडली आहे. दारूचे व्यसन जळलेल्या ज्ञानेश्वर मुंडे हा आईसह सताळा येथे वास्तव्यास होते. दारूची लत लागल्याने तो नेहमी आईजवळून पैसे घेत होता. अशाच प्रकारे २२ डिसेंबरला आईजवळ दारूसाठी पैसे मागू लागला. मात्र आईने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आईच्या डोक्यात लोखंडी पहार घालून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
वडिलांनी दिली फिर्याद
आईच्या डोक्यात वार केल्यानंतर ज्ञानेश्वरने तेथून पळ काढला. काही वेळाने त्याचे वडील घरी आल्यानंतर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देत मुलाविरोधात फिर्याद दिली. या नंतर किनगाव पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतल आहे.