कोल्हापूर - आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्याचा कोल्हापुरात अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जिवितहानी झालेली नाही. मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शन करून झाल्यानंतर तानाजी सावंत जोतिबाला दर्शनासाठी जात होते. यावेळी मंत्री तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते त्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याने अपघात झाला. यामध्ये तानाजी सावंत यांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, आरोग्य मंत्र्यांच्याच ताफ्यात जिल्हा प्रशासनाची रुग्णवाहिका नसल्याचे समोर आलं आहे. सावंत यांच्या ताफ्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही रुग्णवाहिका सहभागी नव्हती.
बातमी शेअर करा