गेवराई - तालुक्यातील सुशी गावात स्मशानभूमी नसल्याने गेल्या पाच तासांपासून मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. सुशी येथील तुळशीराम आश्रुबा कलेढोण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी सुशी गावात स्मशानभूमी नाही. गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते कुटुंब स्वत:च्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करतात. मात्र तुळशीराम कलेढोण यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ते लोक ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे तेथे गेले असता गावकर्यांनी अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला. म्हणून शेवटी तुळशीराम यांचा मृतदेह नातेवाईकांनी थेट ग्रामपंचायतसमोर आणून मांडला. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत मृतदेह ग्रामपंचायतसमोरच होता. घटनास्थळावर तलाठी , मंडल अधिकारी आणि पोलीस दाखल झाल्याचे समजते आहे .
![](https://prajapatra.com/sites/default/files/styles/large/public/Untitled-1%20copy_254.jpg?itok=0IwoCMpv)
बातमी शेअर करा