सध्या कांद्यावर निर्यात बंदी केली असून ती उठवावी तसेच द्राक्षाचे ज्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यावर नक्कीच सरकारने तोडगा काढावा अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. नाशिक येथील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे झालेल्या द्राक्ष व कांदा परिषद शेतकरी मेळाल्यात आमदार कडू बाेलत हाेते. दरम्यान सरकारने ताेडगा काढला नाही तर द्राक्ष व कांदयासाठी लवकरच आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला.
बातमी शेअर करा