पुणे - शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय डॉ. विनायक मेटे यांनी पुण्यातील विमानतळ परिसरात स्वतःच्या पैशांनी खरेदी केलेल्या फ्लॅट वरून त्यांच्या कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आलेला आहे. विनायक मेटे यांच्या मुलाने विनायक मेटे यांची बहिण व तिच्या मुलाविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फ्लॅटची मालकी आमच्या ताब्यात असून घरचे लॉक तोडून आत्या व तिच्या मुलाने अनधिकृतपणे ताबा घेतला आहे अशी तक्रार विनायक मेटे यांच्या मुलाकडून देण्यात आली आहे.
त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात आत्या सत्वशीला महादेव जाधव आणि आकाश महादेव जाधव (रा. पंचगंगा सोसायटी, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशुतोष विनायक मेटे (वय २० रा. कोरेगाव पार्क पुणे) याने फिर्याद दिली आहे.
बातमी शेअर करा