Advertisement

 नागपूर दुर्घटना : मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

प्रजापत्र | Sunday, 17/12/2023
बातमी शेअर करा

नागपूर - नागपुरात आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर-अमरावती रोडवर बाजारगाव येथे ही कंपनी आहे. या कंपनीत सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्फोट झाला असून या प्रकरणी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केला आहे. "नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः IG, SP, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Advertisement

Advertisement