बीड- तालुक्यातील ईट येथील गजानन सहकारी सुत गिरणीला आज दुपारी अचानक आग लागली. यामध्ये एक्सपोर्टसाठी तयार केलेल्या कापसाच्या गठाणी जळाल्या आहेत. आगीची झळ काही मशिनरींनाही बसली असुन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग अटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. दुपारी उशीरा आग अटोक्यात आली असून या आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती मात्र वेळे अभावी समजु शकली नाही.
बातमी शेअर करा