Advertisement

लोकसभा सचिवालयाकडून आठ कर्मचारी निलंबित  

प्रजापत्र | Thursday, 14/12/2023
बातमी शेअर करा

 संसदेतील सुरक्षा भंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई केली आहे. बुधवारी (१३ डिसेंबर) झालेल्या सुरक्षेतील त्रुटीप्रकरणी लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणामुळे निलंबित करण्यात आल्याचे समजते. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी लोकसभा सचिवालयाने निलंबित केलेल्यांची नावे आहेत. संसदेत घुसखोरी करणाऱ्या पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. घुसखोरीच्या घटनेत सहा आरोपींचा सहभाग होता, त्यापैकी एक अद्याप फरार आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या टीमला राजस्थानच्या नीमराना येथे त्याचे लोकेशन सापडले. त्यानंतर जेव्हा पोलिस त्याला पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा तो तेथून फरार झाला. सध्या विशेष पथकाचे दोन पथक आरोपी ललित झाच्या शोधात आहेत. त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

 

 

संसद घुसखोरी प्रकरणात सहापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सहा जणांनी या घटनेचा कट रचल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. संसदेत घुसलेले हे सहा जण दीड वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले. संसदेत येण्यापूर्वी त्यांनी रेकी केली होती.

 

 

TMC खासदार डेरेक ओब्रायन संसदेतून निलंबित
काँग्रेसचे सुद्धा पाच खासदार निलंबित
काँग्रेसचे पाच लोकसभा खासदार, टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे यांनाही लोकसभेतून उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले आहे.

 

Advertisement

Advertisement