मुंबई- शिंदे सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या २५ वर्षांच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबई मनपाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. शिंदे सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अडचण होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. हिंमत असेल तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, जनता तुमच्या कामांचे ऑडिट करेल, असा हल्ला ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्याला शिंदे सरकारकडून मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. यामुळे महानगरपालिकेवरुन शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले आहे.
बातमी शेअर करा