Advertisement

  २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार 

प्रजापत्र | Tuesday, 12/12/2023
बातमी शेअर करा

नागपूर- सभागृहाच्या कामकाजात मराठा आरक्षणावर विस्तृत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे येत्या २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटेल, असा विश्वास मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना व्यक्त केला. 

 

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वादंग उठले आहे. अशात आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सुटावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. मागासवर्गीय आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 

Advertisement

Advertisement