Advertisement

नुकसान भरपाईची 'या' दिवशी विधानसभेत होणार घोषणा

प्रजापत्र | Tuesday, 12/12/2023
बातमी शेअर करा

नागपूर- राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत असून, शुक्रवारी विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा होणार आहे. अवकाळी पाऊस संदर्भात मुख्यमंत्री शुक्रवारी घोषणा करणार असल्याचं मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे, या घोषणेनंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळण्याची शक्यता आहे. 

 

 

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन देखील केले होते. त्यामुळे सरकार मदतीची घोषणा कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना, आता शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत.

Advertisement

Advertisement