Advertisement

मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले

प्रजापत्र | Friday, 08/12/2023
बातमी शेअर करा

बीड - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले. शासकीय कार्यालयांसह इतर ठिकाणावरून गाड्या चोरीला जाऊ लागल्या. गाड्या चोरणार्‍या टोळ्या सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी तहसील कार्यालयासमोरून मोटारसायकल चोरीला गेली आहे.

 

   चंद्रकांत साळुंके यांनी आपली एम.एच. २३ पी. ५७९८ या क्रमांकाची स्प्लेंडर गाडी बीड तहसील कार्यालयासमोर उभी केली असता सदरील गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. साळुंके यांनी सर्वत्र गाडीचा शोध घेतला मात्र त्यांना कुठेही गाडी आढळून आली नाही. दरम्यान कुठे ना कुठे मोटारसायकल चोरीची घटना घडू लागली आहे. शासकीय कार्यालयांसह इतर ठिकाणावरूनही गाड्या चोरीला जात आहेत. गाड्या चोरणार्‍या टोळ्या सक्रिय असल्याचे दिसून येते.

Advertisement

Advertisement