पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपात तथ्य आढळल्यानंतर मोइत्रा यांची खासदारकी रद्द करणअयात आली आहे. एथिक्स समितीने अहवाल दिल्यानंतर हा रिपोर्ट मंजूर करण्यात आला आहे.
या अहवालावर संसदेत चर्चा झाली. त्यानंतर आवाजी मतदानाने महुआ यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या समितीने महुआ यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा