Advertisement

कोकणात 'कोका-कोला' दिली,आम्हाला फॅन्टा तरी द्या !

प्रजापत्र | Tuesday, 05/12/2023
बातमी शेअर करा

 बीड- जिल्ह्यातील परळी येथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कृषीमंत्री मंत्री यांनी बीडच्या एमआयडीसीमध्ये कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. 'कोकणात 'कोका-कोला' दिली, आम्हाला फॅन्टा तरी द्या' असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आपली मागणी मांडली आहे. 

 

 

दरम्यान यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, "आज दोन मागण्या करतोय. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. प्रसाद योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र परळीचा विकास व्हावा. हात जोडून याबाबत प्रार्थना करतो. तीन ऊर्जाशक्तीपीठ म्हणून परळीच्या वैद्यनाथाचे स्थान आहे. एमआयडीसीची कमी होती ती देखील दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, कोकणात तुम्ही कोका-कोला नेला, आम्हाला फॅन्टा तरी आमच्या एमआयडीसीमध्ये द्यावेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.  

Advertisement

Advertisement