जालना- माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. अज्ञात लोकांकडून जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली उभ्या असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. या हल्ल्यात राजेश टोपे यांच्या गाडीची समोरची काच फुटली आहे.
जालन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यानिमित्तानं राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. राजेश टोपे यांची गाडी जिल्हा बँकेच्या इमारतीजवळ उभी असताना त्या ठिकाणी त्यांच्या गाडीच्या समोरील भागावर दगडफेक करण्यात आली. टोपे यांच्या गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली आहे.
अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला
राजेश टोपे यांच्या गाडीवर नेमका कुणी हल्ला केला हे अद्याप समोर आलेलं नाही. अज्ञात व्यक्ती नेमक्या कोण होत्या हे अद्याप समोर आलेलं नाही. राजेश टोपे यांच्या गाडीची समोरची काच यामध्ये फुटली आहे. गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील सापडलेली आहे.