Advertisement

  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळामध्ये सुनावणी

प्रजापत्र | Saturday, 02/12/2023
बातमी शेअर करा

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी  सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाने  दाखल केलेल्या अर्जावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत उत्तर देत आहेत. परिच्छेद १८ मध्ये बनावट ईमेल प्रकरणी माहिती दिली आहे. ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने २२ जून २०२२ रोजी ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ज्या व्यक्तीच्या नावे हा अर्ज दाखल केला आहे, त्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे धाडस दाखवलं नाही. देवदत्त कामत यांनी एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता टोला लगावला आहे. फक्त वकिलांमार्फत ड्राफ्टिंग करण्याचे काम या अर्जात दिसतंय, असं देवदत्त कामत यांनी म्हटलं आहे. 

 

विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने २२ जून २०२२ ला ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही, असा अर्ज शिंदे गटाने केला आहे. त्यावर देवदत्त कामत उत्तर देत आहेत. शिंदे गटाने जानेवारीत दाखवलेल्या नोंदवहीतील ई मेल आयडीवरच मेल पाठवल्याचं देवदत्त कामत यांनी म्हटलं आहे. ज्यांच्या नावे हा अर्ज केला गेला, त्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं धाडस दाखवलं नाही, असा टोला कामत यांनी शिंदे यांना नाव न घेता लगावला आहे.

 

शिंदे गटाकडून जानेवारी महिन्यातील नोंद वही दाखवण्यात येत आहे. त्यांच्याकडून मे महिन्यात प्रकाशित झालेली नोंद वही दाखवण्यात आली नाही. पहिल्याच पानावर एकनाथ शिंदे यांचा तोच ईमेल आयडी दिला आहे, जो आम्ही सादर केला आहे
 

Advertisement

Advertisement