Advertisement

शेतकरी संकटात, मोदी मेलोडी मेलोडी करतात

प्रजापत्र | Tuesday, 26/05/2026
बातमी शेअर करा

सोलापूर : देशभरात सध्या इंधन पुरवठा आणि इंधन दरवाढीवरुन (Petrol) वातावरण तापलं असून विरोधी पक्षातील नेत्यांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra modi) आवाहनानंतर देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे, त्यातच नीट पेपरफुटी प्रकरणावरुनही विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. एकीकडे हे सुरू असतानाच दुसरीकडे इंधन दरवाढ, पुरवठ्यावरुन विरोधकांनी आंदोलने सुरू केल्याचं दिसून येत आहे. इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा फटका भारताला बसल्याने महागाईत वाढ झाल्याने विरोधकांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनीही थेट मोदींवर टीका करत, युद्ध आपल्या देशात नाही, तरी देखील आपल्यावर परिणाम झाल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनाच जबाबदार धरलं आहे.  

   नरेंद्र मोदींच्या पॉलिसीमुळेच भारत युद्धात सहभागी नसतानाही आपल्या लोकांना सगळं भोगावं लागतंय. सध्या डोनाल्ड ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झालीय. शेतकरी संकटात सापडलेला आहे, आणि हे मेलोडी मेलोडी करतं बसलेत. आज सोयाबीन, तुरीला पीक विमा मिळतं नाही. पण, अदानींचे कर्ज माफ करण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. ये तो शुरुवात है, आंदोलन अभी बाकी है.. आम्ही या सरकारचा धिक्कार करतोय, असे म्हणत प्रणिती शिंदेंनी केंद्रातील मोदी सरकावर टीका केलीय.  

शेतकऱ्यांवर जे संकट आज आलं आहे ते मुद्दाम आणलं गेलं आहे. इराणकडून तेल घ्यायचं बंद केलं नसतं तर आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नसते. काही दिवसापूर्वी पंतप्रधान शेतकऱ्यांना सांगतात खतं वापरू नका, खरीपाचा हंगाम असताना शेतकऱ्यांना खतं वापरू नका म्हणतात. शेतकऱ्यांना कोणी अडचणीत टाकलं, देशाला कोणी अडचणीत टाकलं असेल तर ते पंतप्रधानानी अडचणीत टाकलं आहे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले. 

Advertisement

Advertisement