मुंबई - लोकसभेच्या निवडणुकीत पवार विरूद्ध पवार हा जंगी सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. कर्जतमध्ये अजित पवारांनी ही गर्जना केलीय. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. जनता ठरवेल कोण जिंकणार, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. देवगिरी बंगल्यावरील बैठकीला सुप्रिया सुळेंनाही बोलावल्याचा दावा अजित पवारांनी केला. हा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला आहे. देवगिरीतल्या बैठकीला मला बोलावलं नव्हतं, बैठक मी गेटक्रॅश केली, अशी माहिती शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीत सर्वानाच कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मी लोकशाहीवर प्रेम करणारी विश्वास ठेवणारी नागरिक आहे. एखाद्या पक्षाने कुठून निवडणूक लढवावी हा लोकशाही अंतर्गत त्यांचा प्रश्न आहे.मी त्यांच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करते