Advertisement

डॉ.योगिनी थोरात यांचा ऑनलाईन सभात्याग

प्रजापत्र | Friday, 25/12/2020
बातमी शेअर करा

बीड   : येथील जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्याचा अट्टाहास कायम ठेवल्याने भाजपच्या जिल्हापरिषद सदस्य डॉ.योगिणी थोरात यांनी ऑनलाईन सभात्याग करत आपला निषेध व्यक्त केला. 
बीड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी ऑनलाईन पध्दतीने झाली. एकीकडे विधीमंडळ आणि संसदेचे अधिवेशन होत आहे. मंत्र्यांच्या बैठका होत आहेत. मग अशावेळी सर्वसाधारण सभाच ऑनलाईन कशासाठी असा प्रश्‍न भाजपकडून उपस्थित केला गेला होता. मात्र जिल्हापरिषद प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. ऑनलाईन बैठकीत प्रश्‍न मांडता येत नाहीत आणि त्याची तीव्रता लक्षात येत नाही अशी भूमिका डॉ.योगीणी थोरात यांनी घेतली होती. मात्र जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हापरिषदेचे पदाधिकारी ऑनलाईन सर्वसाधारण सभेच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे ऑनलाईन सभा सुरु होताच डॉ.योगिणी थोरात यांनी सभात्याग करत निषेध नोंदवला. 

Advertisement

Advertisement