वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर भाष्य केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
बातमी शेअर करा