Advertisement

सुप्रिया सुळे यांची केसरकरांवर टीका

प्रजापत्र | Monday, 27/11/2023
बातमी शेअर करा

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील कपिलधारा येथे दीपक केसरकर हे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणी ते माध्यमांसोबत बोलत असताना शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या एका महिलेनं वेबसाईटवरील प्रोसेस कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला. यानंतर संतापलेल्या दीपक केसरकर यांनी संबंधित महिलेला शिक्षक भरतीतून नाव डिसक्वालिफाय करु असा इशारा दिला.

 

या व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना आवरावे, अशी विनंती केली आहे. तर सबंधित मंत्र्यांनी त्या मुलीची जाहीर माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

Advertisement

Advertisement