Advertisement

 'ट्रिपल' इंजिन सरकार राज्यात आग लावायला आहे का?  

प्रजापत्र | Saturday, 25/11/2023
बातमी शेअर करा

 नागपूर- राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. निरपराध लोकांवर गुन्हे दाखल झाले, याला दोषी भाजप सरकार आहे. राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. हे तीन तीन इंजिन राज्यात आग लावायला आहे का? असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंनी केला आहे. निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत असा आरोप देखील त्यांनी या वेळी केला. 

 

नाना पटोले म्हणाले, 

वारंवार राज्याचे वातावरण दूषित करण्याचे काम हे भाजप करत आहे. राज्यातील घटनांचा क्रम बघितला तर जरांगे  यांचे आंदोलन सुरू असलेलेली गावात लाठीमारचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले, असे ते स्वत: सांगतात. मात्र लाठीमार कश्यासाठी केल्या गेला हे अद्याप अनुत्तरीत आहे. पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर हा वाद राज्यभर पेटला आहे. राज्याचे मंत्री जाती-समूहात भांडण निर्माण करत असेल तर हे सर्व सरकार प्रणीत आहे. या प्रकरणी अनेक मराठा आंदोलक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत . 

Advertisement

Advertisement