Advertisement

'साईराम' च्या बाहेर ठेवीदारांची गर्दी

प्रजापत्र | Tuesday, 21/11/2023
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात मल्टीस्टेट आणि पतसंस्थाच्या फसव्या धोरणांमुळे खळबळ उडाली असताना आता साईराम अर्बन बँकेच्या बाहेर ग्राहक मोठी गर्दी करू लागल्याचे चित्र बीड शहरातील माळीवेस भागात पाहायला मिळत आहे. बँकेत घोटाळा झाल्याच्या चर्चाना आज सकाळपासून पेव फुटले असून या बँकेचे अध्यक्ष शाहिनाथ परभणे यांचा दूरध्वनी क्रमांक बंद लागत आहे. बीड जिल्ह्यात शाहीनाथ परभणे यांच्या 'साईराम' अर्बनने जिल्ह्यात स्वतःचे मोठे जाळे निर्माण केले आहे. या मल्टीस्टेटचे जाळे जिल्हाभर विस्तारले असून ठेवीची संख्या ही लक्षणीय आहे. आज सकाळपासून बँकेच्या गैर कारभारबाबत चर्चाना पेव फुटल्याने ठेवीदार बँकेच्या दारात गर्दी करू लागले आहे. जिल्ह्यातील अनेक शाखा त्यांच्या बंद आढळत असून साईरामचे मालक शाहिनाथ परभणे यांचा दूरध्वनी क्रमांक बंद लागत आहे. दरम्यान या प्रकारमुळे एकच गोंधळ उडालेला असून अद्याप या मागचे नेमकं कारण समोर आलेले नाही

Advertisement

Advertisement