Advertisement

दिवाळीत एसटी सुसाट सुटणार

प्रजापत्र | Monday, 06/11/2023
बातमी शेअर करा

मुंबई - दिवाळीत एसटी प्रवास अडथळ्याशिवाय सुसाट धावणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते  यांनी दिलेल्या एसटी बंदच्या संप  मागे घेण्यात आला आहे. मंत्री उदय सामंतांसोबत सकारात्मक चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांबाबत बैठकीत महत्वाच्या चार मुद्द्यांवर चर्चा झाली.  मंत्री उदय सामंत यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे.  या बैठकीतील निर्णयाची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. 

 

 उदय सामंत म्हणाले, एसटीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल त्यांना मदत करणं ही आमची भूमिका आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

Advertisement

Advertisement