हातगाव-चंद्रकला ढाकणे यांचे निधन झाल्याने ढाकणे परिवाराचा आधारवड कोसळला आहे. आज त्यांच्या 13 व्याच्या विधिचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती वंजारी ओबीसी विकास महासंघ भारतचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी दिली.
पत्रकात म्हटले आहे,आमच्या ढाकणे परिवार हातगाव मधील स्वतःची मुले, पुतणे ,नातू ,नाती या सर्वांमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा ज्या सावित्री मुळे निर्माण झाली त्या आमच्या ढाकणे परिवाराच्या शैक्षणिक सावित्री व जुन्या मॅट्रिक पास चुलती प्रचंड वाचनाचा छंद असणारे व्यक्तिमत्व गं. भा. चंद्रकला कारभारी ढाकणे या आमच्यात नसल्याने अतीव दुःख आहे. आज राहत्या घरी ढाकणेवस्ती,हातगाव येथे 13 व्या विधीनिमित्त त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
-दादासाहेब ढाकणे (राष्ट्रीय संपर्कप्रमुख) वंजारी ओबीसी विकास महासंघ भारत व सर्व राष्ट्रीय पदाधिकारी..