बीड- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड शहरांमध्ये दुपारच्या सुमारास अचानक आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे अनेक भाग बंद झाले आहे सुभाष रोड, मोंढा रॉड ,जालना रोड या भागात शेकडो आंदोलन रस्त्यावर येऊन त्यांनी घोषणाबाजी करत दगडफेक केल्यामुळे बाजारपेठ तातडीने बंद झाली शहरात वातावरण तणावपूर्ण झाले .
बीड जिल्ह्यात माजलगाव,परळी,बीड ,वडवणी,गेवराई या भागात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत दरम्यान सोमवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान जालना रोड अण्णाभाऊ साठे चौक,सुभाष रोड, मोंढा या भागामध्ये दगडफेकीच्या घटना घडल्यामुळे व्यापार पेठ बंद झाली.
बातमी शेअर करा