Advertisement

अभिनेता राजकुमार राव बनणार निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन'

प्रजापत्र | Wednesday, 25/10/2023
बातमी शेअर करा

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोग अभिनेता राजकुमार रावची नॅशनल आयकॉन म्हणून नियक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी राजकुमार रावची भारतीय निवडणूक आयोगाच्या नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली आहे.

 

 

भारतीय निवडणूक आयोगाकडून राजकुमार राववर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. नॅशनल आयकॉन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या २६ ऑक्टोंबरला याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement