Advertisement

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा अखेर शिवाजी पार्कवरच होणार

प्रजापत्र | Thursday, 12/10/2023
बातमी शेअर करा

मुंबई - शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास अखेर ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या उत्तर विभागाने आज ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

 

जागेसाठी ठाकरे गटासोबतच शिंदे गटानेही परवानगीसाठी पत्र दिले होते, परंतु त्यांनी ते पत्र नंतर मागे घेतलं होतं. त्यामुळं ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला होता. २४ ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे.

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दरवर्षी होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत गेल्यावर्षी प्रमाणे या वर्षी देखील पेच निर्माण झाला होता. यंदा देखील पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली होती, पण अखेर हा पेच निकाली निघाला आहे. कारण शिंदे गटाने आपला अर्ज मागे घेतला होता, त्यामुळं ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर पार पडणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. दरम्यान आज ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे

 

यंदा १ ऑगस्ट रोजी ठाकरे गटानं तर ७ ऑगस्ट रोजी शिंदे गटानं महापालिकेकडं शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? हा प्रश्न निकाला निघाला आहे. 24 ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. 

 

मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला ही परवागनी दिली आहे. त्यानुसार ठाकरे गटाचा दसरा मेळावा 24 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर होणार आहे. 

Advertisement

Advertisement